जिल्ह्यात 112 पॉझिटिव्ह

एकाचा मृत्यू
जिल्ह्यात 112 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या घटल्याने दिसाला व्यक्त केला जात आहे. बुधवारी दिवसभरात नव्याने 112 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 42 वर्षीय महिलेचा (साक्री रोड, धुळे) मृत्यू झाला आहे. जिल्हाची एकुण रूग्ण संख्या 41 हजार 356 वर पोहोचली आहे.

जिल्हा रूग्णालयातील 133 अहवालांपैकी 26, धुळे तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपीड अँटीजन टेस्टचे 9, शिरपूर उपजिल्हा रूग्णालय 5, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 2, उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा 1, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 11, भाडणे ता. साक्री सीसीसी 0, रॅपिड टेस्टचे 12 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मोबाईल मेडीकल टिमचे 3, मनपा सीसीसी 0, मनपा युपीएचसी 26, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 3, एसीपीएम लॅबमधील 8, खाजगी लॅबमधील 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com