धुळ्यात गर्दीच्या ठिकाणी आता होणार आरटीपीसीआर चाचणी

धुळ्यात गर्दीच्या ठिकाणी आता होणार आरटीपीसीआर चाचणी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील करोना संसर्गांची स्थिती लक्षात घेता ज्या ठिकाणी नागरिकांचा वावर जास्त प्रमाणात आहे. अशा ठिकाणी असणार्‍या संस्था तसेच प्रतिष्ठान येथे नागरीकांची आरटीपीसीआर चाचणी घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यांची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे. अशी माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.

करोना संसर्गांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे कोरोना चाचण्या करण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहे. यावर आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाकरून प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यवाही करता येवू शकेल यासाठी अति.आयुक्त गणेश गिरी यांनी तातडीने संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेवून यासंदर्भात आवश्यक त्या सुचना केल्या.

सद्यःस्थितीत बँका, पोस्ट ऑफिस, तसेच केमिस्ट व ड्रग्ज असोसीएशनचे कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी याठिकाणी नागरीकांचा मोठया प्रमाणावर वावर असतो व सदर ठिकाणाहून संसर्गांचा प्रसार मोठयाप्रमाणावर होण्याची शक्यता लक्षात घेवून त्याठिकाणी जागेवरच नागरीक व कर्मचार्‍यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.

यासाठी महापालिकेमार्फत आवश्यक ते तपासणी पथक आरोग्याधिकारी डॉ.महेश मोरे व वैद्यकिय अधिकारी डॉ.संपदा कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली नियुक्त करण्यात आलेले असून त्यांना यासाठी लागणारे आवश्यक ते वैद्यकिय साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदरची कार्यवाही अत्यंत महत्वपुर्ण असून चाचणीसाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शेख यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com