जिल्ह्यात 73 पॉझिटिव्ह

दोन जणांचा मृत्यू
जिल्ह्यात 73 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या घटल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी दिवसभरात केवळ 73 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाची एकुण रूग्ण संख्या 40 हजार 843 वर पोहोचली आहे. त्यापैकी 38 हजार रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 48 पैकी 1, उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 37 पैकी 10, शिरपूर ब्लॉक रॅपिड टेस्टचे 2 पैकी 0, उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा येथील 28 पैकी 1, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 0, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 47 पैकी 12, रॅपिड टेस्टचे 69 पैकी 2 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त सेच मनपा सीसीसी 627 पैकी 1, मनपा युपीएचसी 481 पैकी 0, 5, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 32 पैकी 7, एसीपीएम लॅबमधील 33, खाजगी लॅबमधील 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 60 वर्षीय महिला (साक्री रोड, धुळे), 85 वर्षीय पुरूष (सिध्दार्थ नगर, धुळे) या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 657 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com