जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट पण मृत्यूच्या दरात वाढ

जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट पण मृत्यूच्या दरात वाढ
Corona

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना रुग्ण संख्या घटत असली तरी मृत्यू दर मात्र कायम आहे. आज करोनाने जिल्ह्यात चार जणांचा बळी गेला आहे. तर गुरुवारी 24 तासात 127 बाधित आढळले आहेत.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शहरातील शिवाजी नगर येथील 36 वर्षीय पुरुष, राजदीप सोसायटीतील 64 वर्षीय पुरुष आणि नाणे येथील 60 वर्षीय महिला तर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात तर्‍हाड कसबे येथील 60 वर्षीय पुरुष कोरोना कक्षात उपचार घेत होते.

परंतु आज चौघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने 654 जणांचा बळी घेतला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 252 आणि ग्रामीण भागात 402 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालय येथील 18, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 7, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 4, भाडणे साक्री सीसीसी मधील 6, मनपा सीसीसी मधील 10, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 8, एसीपीएम लॅबमधील 19, खासगी लॅब मधील 11 असे गुरुवारी 24 तासात 127 रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या 40 हजार 770 वर पोहचली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com