धुळ्यात लस घेण्यासाठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

धुळ्यात लस घेण्यासाठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरात लस घेण्यासाठी केंद्रावर नागरिक गर्दी करीत आहेत. अशीच गर्दी ऐंशीफूटी रोडवरील एका दवाखान्यात झाली. यावेळी नागरिकांना करोनाचा विसर पडला होता.

कुठलेही नियम पाळले गेले नाहीत. सोशल डिस्टन्सचा पुर्ण फज्जा उडाला आहे. यातून कोरोनाची संख्या वाढेल की घटेल असा प्रश्न निर्माण होत आहे.

महापालिका प्रशासनाने केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी करु नका, असे आवाहन केले आहे. परंतू महापालिकेचे आवाहन हे कागदावरच दिसून येत आहे. एवढी गर्दी होवूनही महापालिका किंवा पोलीस यंत्रणेने कुठलीही कारवाई केली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com