जिल्ह्यात करोनाने चौघांचा मृत्यू

जिल्ह्यात करोनाने चौघांचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गुरुवारी करोनाने चौघांचा मृत्यू झाला आहे. तर 24 तासात 242 बाधीत आढळले.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निमगुळ येथील 81 वर्षीय पुरुष, तर्‍हाडी येथील 50 वर्षीय पुरुष, धमनार येथील 54 वर्षीय पुरुष आणि एसीपीएम महाविद्यालय येथे फागणे येथील 58 वर्षीय पुरुष कोरोना कक्षात उपचार घेत होते.

त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 623 जणांचा बळी घेतला आहे.

जिल्हा रुग्णालय येथील 43, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 17, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 12, भाडणे साक्री सीसीसीमधील 6, मनपा सीसीसीमधील 16, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 14, एसीपीएम लॅबमधील 28, खासगी लॅबमधील 23 असे गुरुवारी 24 तासात 242 रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांचा आकडा 39 हजार 707 वर पोहचला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com