समाधानकारक, जिल्ह्यात करोना रुग्ण संख्या घटली

समाधानकारक, जिल्ह्यात करोना रुग्ण संख्या घटली

बुधवारी 24 तासात आढळले 286 बाधीत

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण संख्या प्रचंड वाढत होती. परंतू गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे.

बुधवारी 24 तासात जिल्ह्यात 286 बाधीत आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालय येथील 57, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 13, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 15, भाडणे साक्री सीसीसीमधील 12, महापालिका सीसीसीमधील 13, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 13, एसीपीएम लॅबमधील 43, खासगी लॅबमधील 34 असे बुधवारी 24 तासात 286 रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 39 हजार 465 वर पोहचली आहे.

करोनाने तिघांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मोरदडतांडा येथील 65 वर्षीय पुरुष, नेवाडे येथील 50 वर्षीय पुरुष आणि भाडणे येथे दहिवेल येथील 65 वर्षीय पुरुष कोरोना कक्षात उपचार घेत होते. उपचार घेतांना तिघांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आतापर्यंत करोनाने 619 जणांचा बळी घेतला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 242 तर ग्रामीण भागात 377 रुग्णांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com