करोना लसीकरण करण्यापुर्वी नोंदणी प्रक्रिया आवश्यक

आयुक्त अजीज शेख यांची माहिती
करोना लसीकरण करण्यापुर्वी नोंदणी प्रक्रिया आवश्यक

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी सद्य:स्थितीत शहरातील प्रभातनगर, देवपूर, मनपा दवाखाना येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.

लसीकरणासाठी आवश्यक नियोजन व पुर्व तयारी महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत शासनाकडून उपलब्ध होणार्‍या डोसेसनुसार केंद्रांवर लसीचे वाटप करण्यात येणार आहे.

अजीज शेख, आयुक्त

तसेच 45 च्या वरील वयोगटातील नागरिकांसाठी लसीच्या उपलब्धतेनुसार शहरातील विविध केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात येईल. यासाठी लसीकरण करण्यापुर्वी नोंदणी प्रक्रिया करणे आवश्यक आहे. अशी माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.

सद्य:स्थितीत लसीकरण केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून यामुळे कर्मचारी व यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय व अडचण निर्माण होत आहे.

तसेच गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा प्रसार वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्यापुर्वी नागरिकांनी www.cowin.gov.in या साईटवर जावून नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी केल्यानंतर प्रत्येक दिवशी स्टॉल बुक करणे, त्यामध्ये केंद्र, दिनांक व वेळ याची प्रक्रिया करावी. संबंधित नागरिकाला लसीकरणासाठी निश्चित करण्यात आलेले केंद्र व दिनांक याबाबत मोबाईलवर संदेश आल्यानंतर संबंधित लसीकरण केंद्रावर दिलेल्या वेळेत लसीकरणासाठी उपस्थित राहणे अपेक्षीत आहे.

त्यामुळे केंद्रावरील विनाकारण होणारी गर्दी कमी होवून नागरिकांचीही गैरसोय होणार नाही. याबाबत नागरिकांनीही या सूचनांचे पालन करावे व कोरोना संभाव्य प्रसार कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेख यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com