जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू

250 पॉझिटीव्ह, गर्दी आवरेना
जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या घटली आहे. मंगळवारी दिवसभरात नव्याने 250 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

तर पाच जणांना मृत्यू झाला आहे. एकुण रूग्ण संख्या 39 हजार 179 वर पोहोचली आहे. बाधितांचा आकडा घटत असला तरी गर्दी मात्र कमी होत नसल्याचेच चित्र आहे.

जिल्हा रुग्णालयातील 201 अहवालांपैकी 55, प्राथमिक आरोग्य केंद्रातील धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 433 पैकी 28 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 79 पैकी 5, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 190 पैकी 13, उपजिल्हा रूग्णालय दोडाईचा येथील 73 पैकी 14, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 168 पैकी 20, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 421 पैकी 33 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा सीसीसी 15, युपीएचसी रॅपीड अँटीजन टेस्टच्या 1369 पैकी केवळ 2 अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 12, एसीपीएम लॅबमधील 38, खाजगी लॅबमधील 15 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 55 वर्षीय महिला (रासकर नगर, धुळे), 35 वर्षीय पुरूष (विटाई ता. धुळे), उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा येथे दाखल 69 वर्षीय पुरूष (वरझडी ता.शिंदखेडा), डीसीएचसी भाडणे येथे दाखल 70 वर्षीय पुरूष (बेहेड ता. साक्री), डीसीएचसी पिंपळनेर येथे दाखल 80 वर्षीय पुरूष (गोपालनगर, पिंपळनेर) यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 616 जणांचा करोनाने बळी गेेला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com