महापालिकेतर्फे सात दिवसात 138 करोना रूग्णांवर अंत्यसंस्कार

महापालिकेतर्फे सात दिवसात 138 करोना रूग्णांवर अंत्यसंस्कार

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

सात दिवसात शहर व जिल्हा हद्दीतील तसेच नंदूरबार, मालेगाव, अमळनेर येथील 138 कोरोना रूग्णांवर महापालिकेतर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

करोना संसर्गाची तीव्र लाट, वाढलेला मृत्यू दर यामुळे कोविड स्मशानभूमीत 24 तास होणारे अंत्यसंस्कार या परिस्थितीत मानवतेच्या दृष्टीकोनातून मनपा कर्मचार्‍यांचे अंत्यसंस्कारासाठी सुरू असलेले अविरत प्रयत्न कौतूकास्पद ठरलेले आहे.

करोनाची दुसरी लाट सूरू आहे. व संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत आहे. यात कोरोना मृत्यू दराचे प्रमाण वाढत असल्यानेे महापालिकेच्या हिरे मेडिकल महाविद्यलयाच्या लगत असलेल्या कोविड स्मशानभुमीत मोठया प्रमाणावर दिवस-रात्र अंत्यसंस्कार विधी महापालिकेच्या कर्मचार्‍यांतर्फे विनामूल्य केले जात आहे.

दि. 18 ते 24 एप्रिल या कालावधीत शहर व जिल्हा हद्दीतील तसेच नंदूरबार, मालेगाव,अमळनेर येथील एकूण 138 रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. यासाठी त्याठिकाणी दोन शिफ्टमध्ये पाच कर्मचारी नियुक्त केलेले असून महापालिकेतर्फे मयत करोना रूग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी विनामूल्य लाकूड, गोवरी,तसेच नातलगासाठी पी.पी.ई.किट पूरविण्यात येत आहे.

तसेच त्याठिकाणी 24 तास पाण्याचे टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दैंनदिन स्वच्छता करण्यात येते. नुकतेच याठिकाणी रूग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होवू नये यासाठी महापालिकेतर्फे बैठकीसाठी शेड तसेच अंत्यविधीसाठी दोन ओटे बांधण्यात येवून जागा सपाटीकरण करण्यात आलेले आहे.

मयत रूग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी सामाजिक बांधिलकीतून विविध संस्था व दानशूर व्यक्तींकडून लाकूड पूरवठा करण्यात आलेला आहे. 24 तास अविरत सेवा मनपामार्फत पूरविण्यात येत आहे.

यासाठी सहा.आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील हे कार्यरत आहेत. स्व:ताच्या आरोग्याची पर्वा न करता या भावनिक परिस्थितीत नातलगांना आधार मिळावा व अंत्यविधी संस्कार यर्थायोग्य पार पाडावा यासाठी मनपाची संपूर्ण टीम याठिकाणी सेवाभावी वृत्तीने या सर्व कार्यवाहीसाठी प्रयत्नशील आहे.

अनेकदा नागरीक भिती अभावी अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नाही. अशा परिस्थितीत मनपा कर्मचार्‍यांमार्फत विधीवत अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. सदरचे काम विनामूल्य करण्यात येत असून नागरीकांनी याबाबत कोणालाही शुल्क अदा करू नये.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com