जिल्ह्यात करोनाने नऊ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात करोनाने नऊ जणांचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाने नऊ जणांचा बळी गेला असून सोमवारी 24 तासात 400 बाधित आढळून आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धुळ्यातील समर्थ नगरातील 75 वर्षीय पुरुष, अकलाड येथील 69 वर्षीय पुरुष, जिल्हा रुग्णालय येथे धुळ्यातील 65 वर्षीय पुरुष, कलमाडी येथील 77 वर्षीय पुरुष, पिंपळनेर येथील 45 वर्षीय पुरुष, गंगाई येथील 53 वर्षीय पुरुष, देवळीपाडा येथील 55 वर्षीय पुरुष, एसीपीएम महाविद्यालय येथे निमडाळे येथील 42 वर्षीय पुरुष, सुट्रें पाडा येथील 48 वर्षीय पुरुष कोरोना कक्षात उपचार घेत होते. उपचारा दरम्यान या नऊ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 611 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

जिल्हा रुग्णालय येथील 78, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील नऊ, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील आठ, भाडणे साक्री सीसीसी मधील 21, मनपा सीसीसी मधील 33, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 21, एसीपीएम लॅब मधील 45, खासगी लॅब मधील 39 असे एकूण 400 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात बाधितांची संख्या 38 हजार 929 वर पोहचली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com