जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू, 379 पॉझिटीव्ह

जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू, 379 पॉझिटीव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा कहर कायम असून शुक्रवारी दिवसभरात नव्याने 379 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर आठ जणांना मृत्यू झाला आहे. एकुण रूग्ण संख्या 38 हजार 226 वर पोहोचली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 225 अहवालांपैकी 69, प्राथमिक आरोग्य केंद्रातील धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 414 पैकी 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 78 पैकी 24, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 271 पैकी 7, उपजिल्हा रूग्णालय दोडाईचा येथील 62 पैकी 15, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 288 पैकी 30, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 10, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 468 पैकी 67 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा सीसीसी 26, युपीएचसी रॅपीड अँटीजन टेस्टच्या 1720 पैकी केवळ 5 अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 16, एसीपीएम लॅबमधील 44, खाजगी लॅबमधील 50 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 55 वर्षीय पुरूष (बोराडी, शिरपूर), 80 वर्षीय पुरूष (अभय कॉलेज,धुळे), 60 वर्षीय पुरूष (बडगुजर प्लॉट, धुळे), 30 वर्षीय पुरूष (सडगाव ता. धुळे), डीसीएचसी भाडणे येथे दाखल 65 वर्षीय पुरूष (प्रतापपूर ता. साक्री), डीसीएचसी पिंपळनेर 70 वर्षीय पुरूष (जामुनपाडा), 60 वर्षीय पुरूष (पिंपळनेर सीसीसी) व एसीसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 69 वर्षीय महिला (सातारणे ता. धुळे) यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 593 जणांचा कोरोनाने बळी गेेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com