जिल्ह्यात करोनाने सहा जणांचा बळी

जिल्ह्यात करोनाने सहा जणांचा बळी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी 24 तासात 310 बाधीत आढळून आले आहेत.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देवपूर येथील 69 वर्षीय पुरुष, शिरपूर येथील 40 वर्षीय महिला, फागणे येथील 58 वर्षीय पुरुष, नांदगाव येथील 20 वर्षीय महिला, धुळे येथील 54 वर्षीय आणि 55 वर्षीय पुरुष हे कोरोना कक्षात उपचार घेत होते.

उपचारादरम्यान या सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 585 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

जिल्हा रुग्णालय येथील 53, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 14, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील चार, भाडणे साक्री सीसीसीमधील तीन, महापालिका सीसीसीमधील 20, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दहा, एसीपीएम लॅबमधील 45, खासगी लॅबमधील 32 असे 24 तासात 310 बाधीत आढळले.

जिल्ह्यात बाधितांची संख्या 37 हजार 847 वर पोहचली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com