जिल्ह्यात करोनाने सहा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात करोनाने सहा जणांचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 तासात 269 बाधीत आढळून आले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चौगाव येथील 54 वर्षीय पुरुष, धुळे येथील 62 वर्षीय दोन पुरुष, एसीपीएम महाविद्यालयात धुळे येथील 60 वर्षीय पुरुष आणि आर्वी येथील 52 वर्षीय पुरुष कोरोना कक्षात उपचार घेत होते.

त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 579 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 230 आणि ग्रामीण भागात 349 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालय येथील 41, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय सात, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय सात, भाडणे साक्री सीसीसीमधील 16, एसीपीएम लॅबमधील 47, खासगी लॅबमधील 27 असे 269 करोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात बाधितांची संख्या 37 हजार 501 वर पोहचली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com