दोंडाईचातच बेड शिल्लक, शिंदखेड्यात ऑक्सिजन बेडची आवश्यकता नाही

आ.जयकुमार रावल यांच्या आरोपांवर जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्टीकरण
दोंडाईचातच बेड शिल्लक, शिंदखेड्यात ऑक्सिजन बेडची आवश्यकता नाही

दोंडाईचा - Dondaicha - प्रतिनिधी :

दोंडाईचा येथे निर्माण करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये बेड शिल्लक आहेत, तर पुन्हा शिंदखेड्यात नवीन बेडची आवश्यकता नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे. याबाबत भाजपचे आ. जयकुमार रावल यांनी त्यांच्यावर आरोप केला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या बैठकीत यादव यांनी याबाबत स्पष्टीकरण करतांना सांगितले की, दोंडाईचा प्रमाणे शिंदखेडा येथे देखील कोविड सेंटरला ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात यावी.

मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असून तो रोष लोकप्रतिनिधींवर यावा असा उद्देश जिल्हा प्रशासनाचा तर नाही किंवा मुद्दाम तशी खेळी करण्यात येत आहे का ?

असा थेट आरोप महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपल्यावर करण्यात तो योग्य नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान माझ्या मतदार संघात शासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात कुचराई होत असल्याने आपण आमदार निधीतून शिंदखेडा शहरासाठी 20 ऑक्सिजन कंसट्रेटर उपलब्धता करून देत असल्याची माहिती आ. रावल यांनी दिली आहे.

सोमवारी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी कोरोना बाबतीत जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.

यात आ. रावल यांनी शिंदखेडा शहरात ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यासाठी फेब्रुवारीपासून पाठपुरावा करून देखील जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षाच्या आमदारांकडे कमी व्यवस्था करावी, अशा सूचना तर दिल्या नाहीत ना? म्हणून आमच्या मागण्या मान्य होत नाही का? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समोर हा विषय मांडला तरी देखील शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सोय नाही, रेमडेसिविर नाही, यात प्रशासन शिंदखेडा शहरावर अन्याय करीत आहे, असा थेट आरोप केला यावर जिल्हाधिकारी यादव यांच्यावर करण्यात आला.

शिंदखेडा तालुक्यात दोंडाईचा येथे असलेल्या कोविड सेंटर मध्येच बेड शिल्लक आहेत उपजिल्हा रुग्णालयात देखील अनेक बेड शिल्लक आहेत त्यामुळे नवीन ऑक्सिजन बेडची आवश्यकता नसल्याचा स्पष्टीकरण जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com