जिल्ह्यात 314 पॉझिटीव्ह, चार जणांचा मृत्यू

जिल्ह्यात 314 पॉझिटीव्ह, चार जणांचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना रूग्ण संख्येत चढउतार सुरू आहे. मंगळवारी दिवसभरात 314 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर चार जणांना मृत्यू झाला आहे. एकुण रूग्ण संख्या 37 हजार 180 वर पोहोचली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 229 अहवालांपैकी 29, प्राथमिक आरोग्य केंद्रातील धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 413 पैकी 48 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 114 पैकी 32, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 119 पैकी 4, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 335 पैकी 39, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 17, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 502 पैकी 69 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा युपीएचसी रॅपीड अँटीजन टेस्टच्या 1795 पैकी केवळ 5 अहवाल पॉझिटीव्ह आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 14, एसीपीएम लॅबमधील 45, खाजगी लॅबमधील 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 56 वर्षीय पुरूष (मांजरी, पिंपळनेर), 80 वर्षीय महिला (भिरडाणे ता.धुळे), डीसीएचसी भाडणे येथे दाखल 67 वर्षीय पुरूष (दारखेल ता. साक्री) व एसीसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 58 वर्षीय पुरूष (जीटीपी स्टॉप, धुळे) यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण 572 जणांचा कोरोनाने बळी गेेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com