जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू, 571 पॉझिटीव्ह

जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू, 571 पॉझिटीव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झाला आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल 571 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर दहा जणांना मृत्यू झाला आहे. एकुण रूग्ण संख्या 36 हजार 866 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 384 अहवालांपैकी 92 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 28, उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 36, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 8, दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालय 20, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 39, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 35, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 99 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा सीसीसी 36, मनपा युपीएचसी 4, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 36, एसीपीएम लॅबमधील 45, खाजगी लॅबमधील 93 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 72 वर्षीय पुरूष (नगावबारी, देवपूर), 70 वर्षीय पुरूष (उमरे ता. साक्री), 72 वर्षीय महिला (अजबे नगर, धुळे), 65 वर्षीय महिला (साक्री), 40 वर्षीय पुरूष (कंगणपूर, शिंदखेडा), उपजिल्हा रूग्णालयात शिरपूर येथे दाखल 67 वर्षीय महिला (मांजरोद, शिरपूर), 62 वर्षीय महिला (भटाणे, शिरपूर), एसीसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 60 वर्षीय पुरूष (कुसुंबा ता. धुळे), 66 वर्षीय पुरूष (अवधान ता. धुळे) व 65 वर्षीय पुरूष (शिरपूर) या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 566 जणांचा करोनाने बळी गेेला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com