जिल्ह्यात करोनाने पाच जणांचा मृत्यू

नव्याने आढळले 204 रुग्ण
जिल्ह्यात करोनाने पाच जणांचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर रविवारी 24 तासात 204 रुग्ण आढळले. जिल्ह्यात बाधितांचा आकडा 36 हजार 295 वर पोहचला आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धुळे येथील वसुंदरा नगरातील 80 वर्षीय पुरुष, वारकुंडाणे येथील 47 वर्षीय पुरुष, चौगाव येथील 55 वर्षीय पुरुष आणि एसीपीएम महाविद्यालयात कापडणे येथील 71 वर्षीय महिला, पाष्टे येथील 53 वर्षीय महिला करोना कक्षात उपचार घेत होते.

उपचार घेतांना पाचही जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 556 जणांचा बळी गेला आहे. तर महापालिका क्षेत्रात 221 आणि ग्रामीण भागात 335 रुग्णांचा समावेश आहे.

एसीपीएम लॅबमधील 108, खासगी लॅबमधील 78 असे एकूण 204 बाधीत आज जिल्ह्यात आढळले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com