जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू, 434 पॉझिटीव्ह

जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू, 434 पॉझिटीव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात नव्याने 434 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर सात जणांना मृत्यू झाला आहे. एकुण संख्या 36 हजार 91 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 246 अहवालांपैकी 85 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 29, उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 15, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 4, दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालय 18, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 42, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 35, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 63 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा सीसीसी 16, मनपा युपीएचसी 5, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 22, एसीपीएम लॅबमधील 62, खाजगी लॅबमधील 38 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 64 वर्षीय पुरूष (नामदेव बापू नगर, देवपूर), 47 वर्षीय पुरूष (साईबाबा नगर, धुळे), 60 वर्षीय पुरूष (मौजवीगंज, धुळे), उपजिल्हा रूग्णालयात शिरपूर येथे दाखल 62 वर्षीय महिला (थाळनेर), एसीसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 47 वर्षीय पुरूष (क्रांती नगर, धुळे), 54 वर्षीय महिला (कुसूंबा ता. धुळे) व 40 वर्षीय महिला (कुंडाणे वार ता. धुळे) या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 550 जणांचा कोरोनाने बळी गेेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com