पतीपाठोपाठ पत्नीचेही करोना संसर्गामुळे निधन

पतीपाठोपाठ पत्नीचेही करोना संसर्गामुळे निधन

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोनारूपी राक्षस आता अनेकांची घरे उध्वस्त करीत आहे. शहरातील गोकुळ माकडे यांना अग्नीडाग दिला जात नाही तोच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील गोकुळ भिका माकडे (वय 47) हे सुनंदाताई केले महिला पतसंस्थेत नोकरीला होते. त्यांना कोरोनाची बाधा झाली. पाहता पाहता कोरोनाने त्याची पत्नी जयमाला (वय 41) यांनाही लपेट्यात घेतले.

करोनाशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. यात गोकुळ माकडे यांचा मृत्यू झाला. त्यांना अग्निडाग दिला जात नाही तोच त्यांच्या पत्नीनेही जगाचा निरोप घेतला.

या दाम्पत्यास 14 वर्षाचा मुलगा तर 16 वर्षांची मुलगी आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांचे मातृपितृ छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com