जिल्ह्यात 435 पॉझिटीव्ह

जिल्ह्यात 435 पॉझिटीव्ह

आठ जणांचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा कहर कायम असून शुक्रवारी नवीन 435 बाधित रूग्ण आढळून आले. तर आठ जणांना मृत्यू झाला आहे.बाधितांची एकुण संख्या 35 हजार 657 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 228 अहवालांपैकी 58 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 33, उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 10, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 16, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 30, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 16, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 88 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा सीसीसी 3, मनपा युपीएचसी 7, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 9, एसीपीएम लॅबमधील 90, खाजगी लॅबमधील 77 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 60 वर्षीय महिला (धुळे), 50 वर्षीय पुरूष (न्याहळोद ता.धुळे), 39 वर्षीय पुरूष (शनीनगर, धुळे), 48 वर्षीय महिला (साक्री), उपजिल्हा रूग्णालयात शिरपूर येथे दाखल 55 वर्षीय महिला (कळमसरे), भाडणे ता. साक्री डीसीएचसीत दाखल 74 वर्षीय महिला (ब्राम्हणवेल ता. साक्री),60 वर्षीय पुरूष (मालखेडा ता. साक्री) व एसीसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 61 वर्षीय महिला (निमखेडी) या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 542 जणांचा कोरोनाने बळी गेेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com