ऑक्सिजनसाठी 80 लाखाचा निधी

आ.फारूक शाह यांची एमआयडीसीतील स्वत:ची जागाही प्लांटसाठी देण्याची तयारी
ऑक्सिजनसाठी 80 लाखाचा निधी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील सद्यस्थितीत कोविड 19 चे रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे ऑक्सिजनचा प्रंचड तुडवडा जाणवत आहे.

यामुळे रुग्णही दगावत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आ.फारुक शाह यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 80 लाख रुपये उपलब्ध करुन दिले आहे.

विशेष म्हणजे यासाठी उभाराव्या लागणार्‍या प्लांट करीता एमआयडीसी मधील जागा क्रं.डी.43 ही स्वतःच्या मालकीची दहा हजार स्केअर फुट जागा दोन वर्षांसाठी विनामुल्य देण्याची तयारीही दर्शविूली आहे.

सध्या रेमडीसिव्हीर इंजेक्शनसाठी सुरु असलेली रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ आणि हालअपेष्टा पाहता त्यांनी रेमडीसिव्हीर इंजेक्शनसाठी देखील 20 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधी संदर्भातील पत्र त्यांनी दि.23 रोजी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे सुपूर्त केले आहेत.

याआधी देखील आ.शाह यांनी दोन विद्युतदाहीनी केंद्र उभारण्यासाठी मनपाला 30 लक्ष रुपये निधी दिला आहे. शहराचे आमदार म्हणून जनतेप्रती असलेले आपले कर्तव्य विचारात घेता आ.शाह यांनी करोना काळात पुढे येवून मदतीचा हात दिला आहे.

राजकारण किंवा पक्षभेद करण्यापेक्षा जनतेच्या हिताची, गरजेचे कामे करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

त्यांच्या या कामांबाबत आम जनतेतूनही समाधानकारक प्रतिक्रिया उमटत असून जिल्हा प्रशासन, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासन यांनाही ते वेळोवेळी सहकार्य करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com