जिल्ह्यात करोनाने सात जणांचा बळी

24 तासात आढळले 371 रुग्ण
जिल्ह्यात करोनाने सात जणांचा बळी

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाने सात जणांचा मृत्यू झाला असून गुरुवारी 24 तासात 371 बाधीत आढळून आले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चिंचवार येथील 27 वर्षीय पुरुष, सिध्दार्थ नगर येथील 51 वर्षीय पुरुष, दहिवेल येथील 66 वर्षीय पुरुष, एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात सायने नंदाणे येथील 47 वर्षीय पुरुष, सुभाषनगर येथील 41 वर्षीय पुरुष, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे कुरखळी येथील 51 वर्षीय पुरुष, चक्रधर कॉलनीमधील 65 वर्षीय पुरुष, कोरोना कक्षात उपचार घेत होते. उपचारा दरम्यान या सात जणांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आतापर्यंत 534 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. यात महापालिका क्षेत्रात 214 आणि ग्रामीण भागात 320 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालय येथील 66, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 87, भाडणे साक्री सीसीसीमधील 15, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील नऊ, एसीपीएम लॅबमधील 68, खासगी लॅबमधील एक असे गुरुवारी 24 तासात 371 रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 35 हजार 222 वर पोहचली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com