जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू, 296 पॉझिटीव्ह

जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू, 296 पॉझिटीव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात नव्यात 296 करोना बाधित रूग्ण आढळून आले. तर सात जणांना मृत्यू झाला आहे. बाधितांची एकुण संख्या 34 हजार 844 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 233 अहवालांपैकी 24 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 10, उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 10, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 3, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 30, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 17, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 60 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा सीसीसी 14, मनपा युपीएचसी 7, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 9, एसीपीएम लॅबमधील 84, खाजगी लॅबमधील 28 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 60 वर्षीय महिला (शिरपूर), 53 वर्षीय पुरूष (नारायण मास्तर चाळ, धुळे), 38 वर्षीय महिला (साक्री), 49 वर्षीय पुरूष (ओझरपाडा, साक्री), 65 वर्षीय महिला (धुळे), एसीसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 31 वर्षीय पुरूष (सोनवाडी ता.धुळे) व उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथे दाखल 70 वर्षीय पुरूष (शिरपूर) या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 526 जणांचा कोरोनाने बळी गेेला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com