जिल्ह्यात नव्याने 490 पॉझिटीव्ह

तीन जणांचा मृत्यू
जिल्ह्यात नव्याने 490 पॉझिटीव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा कहर कायम असून रूग्ण संख्या वाढत आहेत. मंगळवारी दिवसभरात नव्याने 490 बाधित रूग्ण आढळून आले. तर तीन जणांचा मृत्यू झाला. एकुण रूग्ण संख्या 34 हजार 548 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 417 अहवालांपैकी 78 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 31, उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 21, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 7, उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा येथील 0, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 38, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 21, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 133 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा सीसीसी 35, मनपा युपीएचसी 11, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 22, एसीपीएम लॅबमधील 44, खाजगी लॅबमधील 49 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 50 वर्षीय महिला (चित्तोड, धुळे), एसीसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 57 वर्षीय पुरूष (व्दारका नगर, नकाणे रोड,धुळे) भाडणेतील डीसीएसची येथे दाखल 54 वर्षीय पुरूष (बोधगाव, साक्री) या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 518 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com