निजामपूरातील राणे कुटूंबातील तिघांचा करोनाने मृत्यू

निजामपूरातील राणे कुटूंबातील तिघांचा करोनाने मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील निजामपूर येथील राणे कुटूंबातील तिघांचा करोनाने बळी घेतला. यामुळे राणे कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राणे कुटूंबिय सुखासमाधानाने नांदत होते. परंतू पंधरा दिवसांपुर्वी धृवकुमार धोंडू राणे यांना कोरोनाची बाधा झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

राणे कुटूंबिय हे दुःख पचवित असतांनाच त्यांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक धोंडू सोनू राणे यांचाही कोरोनाने मृत्यू झाला.

त्यानंतर पुन्हा नियतीने राणे कुटूंबियांवर घाला घातला. घरातील कर्ते व ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र धोंडू राणे यांनाही कोरोनाने घेरले. त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. परंतू ती झुंज अपयशी ठरली. आज दि. 19 एप्रिल रोजी राजेंद्र राणे यांचा मृत्यू झाला.

राजेंद्र राणे हे देशदूतचे निजामपूर वार्ताहर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com