जिल्ह्यात 600 पॉझिटीव्ह

दोन जणांचा मृत्यू
जिल्ह्यात 600 पॉझिटीव्ह
Corona

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झाला आहे. सोमवारी तब्बल 600 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर दोन जणांचा मृत्यू झाला. एकुण रूग्ण संख्या 34 हजार 58 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 131 अहवालांपैकी 30 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 37, उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 29, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 26, उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा येथील 13, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 35, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 6, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 130 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा सीसीसी 26, मनपा युपीएचसी 28, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 19, एसीपीएम लॅबमधील 75, खाजगी लॅबमधील 146 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 75 वर्षीय पुरूष (राम नगर, धुळे) व एसीसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 40 वर्षीय महिलेचा (धाडरे ता. धुळे) कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 515 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com