मनपातर्फे रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होणार !

भाजपा महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार यांचा पाठपुरावा
मनपातर्फे रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होणार !

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

महापालिकेतर्फे रेमेडीसिवीर इंजेक्शन लवकरच उपलब्ध होणार आहे. यासाठी भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल व महापौर चंद्रकांत सोनार यांनी पाठपुरावा केला आहे. यासाठी आयुक्त अजीज शेख यांना लेखीपत्र देण्यात आले आहे.

शहरात सद्य:स्थितीत कोरोनाचा प्रभाव वाढत असून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोना बाधीत रुग्णांवर तातडीने उपचाराची गरज असून त्यासाठी रेमेडीसिवीर इंजेक्शन मोठ्या प्रमाणावर लागत आहे.

जिल्हयात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थित रुग्णांना दिलासा मिळावा व इंजेक्शन उपलब्ध व्हावे. यासाठी भाजपाचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी तातडीने बंगलोर येथील मायलन कंपनीशी संपर्क करुन सदर रेमेडीसिवीर इंजेक्शन धुळे महानगरातील जनतेसाठी उपलब्ध करुन देण्याबाबत पाठपुरावा सुरु केला आहे.

यासाठी आयुक्त अजीज शेख यांना लेखीपत्राव्दारे अनुप अग्रवाल व महापौर चंद्रकांत सोनार यांनी लेखी पत्र दिलेले आहे.

सदरचे इंजेक्शन महापालिकेतर्फे तातडीने उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केली आहे. आयुक्त अजीज शेख यांनीही सकारात्मक भूमिका घेवून तातडीने शहरातील नागरीकांच्या जीवितासाठी सदर कंपनीला आवश्यक तो कार्यादेश देवून प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.

शहरासाठी प्रथम टप्प्यात सुमारे 6500 इंजेक्शन मागविण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती पूर्तता करण्यात आलेली आहे. लवकरच सदर इंजेक्शन महापालिकेस प्राप्त होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com