जिल्ह्यात 11 जणांचा बळी, 457 पॉझिटीव्ह

जिल्ह्यात 11 जणांचा बळी, 457 पॉझिटीव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झाला आहे. रूग्ण संख्या वाढतच असून आता मृत्यूदरही वाढला आहे. शनिवारी तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला.

तर नव्याने 456 बाधित रूग्ण आढळून आले. बाधितांची एकुण रूग्ण संख्या 33 हजार 321 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 405 अहवालांपैकी 41 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे 48, उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 24, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 19, उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा येथील 42, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 11, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 6, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 109 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. तसेच मनपा सीसीसी 14, मनपा युपीएचसी 19, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 15, एसीपीएम लॅबमधील 27, खाजगी लॅबमधील 81 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 58 वर्षीय महिला (म्हसदी ता. साक्री), 69 वर्षीय महिला (दोंडाईचा), 84 वर्षीय पुरूष (छडवेल ता. साक्री) व एसीसीपएम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 28 वर्षीय पुरूष (उडाणे ता. धुळे), 46 वर्षीय पुरूष (बोरविहीर ता. धुळे), 47 वर्षीय पुरूष (चिमठावळ), 63 वर्षीय पुरूष (सोनगीर), 45 वर्षीय पुरूष (नंदाणे), 77 वर्षीय महिला (मुकटी), 75 वर्षीय महिला (कुसूंबा) तसेच खाजगी हॉस्पिटलमधील 41 वर्षीय महिला (धुळे) या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 508 जणांचा करोनाने बळी गेला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com