ग्रामीण भागात कोवीड चाचणी करण्याची गरज

जि.प. सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांचे आरोग्याधिकार्‍यांना पत्र
ग्रामीण भागात कोवीड चाचणी करण्याची गरज

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

दिवसेंदिवस करोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता आताच ठोस उपाय केले नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल, अशी भिती व्यक्त करतांनाच ग्रामीण भागात कोवीड चाचणी करण्याची मागणी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर भामरे यांनी केली आहे.

करोनाने आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला असून शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ गावातील उद्भवलेली परिस्थिती याचे ज्वलंत उदाहरण आहे.

छोट्या छोट्या गावांमध्येही आता बाधितांची आणि दुर्दैवाने मृतांची संख्या वाढता आहे. या संदर्भातील धोका आपण यापुर्वीच 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केला होता.

वास्तविक त्याचवेळी प्रशासनाने दखल घेणे गरजेचे होते. अजूनही वेळ गेलेली नाही. आरोग्य केंद्रे, जिल्हा उपकेंद्र कोरोनाबाबतच्या सर्व चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आणि गावा गावात चाचण्या वाढविल्या तर परिस्थिती नियंत्रणात आणता येवू शकते.

अन्यथा भविष्यातील धोका महा भयंकर असेल अशी भिती श्री.भामरे यांनी आरोग्याधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात नमूद केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com