जिल्ह्यात नवीन 585 पॉझिटीव्ह

तीन जणांचा मृत्यू
जिल्ह्यात नवीन 585 पॉझिटीव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असून शुक्रवारी नव्याने तब्बल 585 रूग्ण आढळून आले. त्यात एसआरपीएफ 1, टेक्नीकल कॉलेज जेलरोड 1, साक्री पंचायत समिती 1 व रावळ गढीवरील एका रूग्णाचा समावेश आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण रूग्ण संख्या 32 हजार 865 वर पोहोचली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 331 अहवालांपैकी 52 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 19, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 21, उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा येथील 1, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 41, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 33, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 148 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा सीसीसी 19, मनपा युपीएचसी 13, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 16, एसीपीएम लॅबमधील 41, एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालय 62, धुळे तालुका रॅपीड अँटीजन टेस्ट 14, खाजगी लॅबमधील 105 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 51 वर्षीय महिला (नगावबारी, धुळे), 56 वर्षीय पुरूष (पिंपळनेर) व एसीसीएम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 76 वर्षीय पुरूष (कापडणे ता. धुळे) या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 487 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com