जिल्ह्यात 600 पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात बाधितांचा वर्षभरातील ‘रेकॉर्ड ब्रेक’
जिल्ह्यात 600 पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू
34 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मागील वर्षभरापासून आतापर्यंत बाधितांची रेकॉर्ड ब्रेक संख्यासमोर आली असून गेल्या 24 तासात तब्बल 600 पॉझिटिव्ह रुग्ण अहवालांती निष्पन्न झाले आहेत. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील करोनाची स्थिती दिवसेंदिवस आटोक्यात येण्याऐवजी बिघडत चालली आहे. शासनाने आता 15 दिवसांचा लॉकडाऊन केला असला तरी यापुर्वी उसळलेली गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरले आहे.

गेल्या 24 तासात बाधितांच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार जिल्हा रुग्णालयातील 540 पैकी 87 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

धुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 800 अँटीजन टेस्टपैकी 136, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 161 पैकी 34, शिरपूर ब्लॉक रॅपीड टेस्ट 352 पैकी 17, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय 104 पैकी 13, शिंदखेडा रुग्णालयातील 132 पैकी 27, साक्री तालुक्यातील भाडणे 1115 पैकी 125 तसेच महापालिकेच्या कोविड सेंटरमधून 99 पैकी 6, युपीएससी सेंटर मनपामधील 1373 पैकी 9, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 69 पैकी 23, एसीपीएम लॅबमधील 231 पैकी 122, खासगी लॅबमधील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 32 हजार 280 रुग्ण बाधीत झाले आहेत.

आठ रुग्णांचा मृत्यू

24 तासात जिल्ह्यात आठ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 6 तर एसीपीएम मेडिकल कॉलेजमध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये साक्री, शिरपूर, दोंडाईचा, बोराडी, शिरधाणे व धुळ्यातील रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com