शिरपूरात भाजीपाला विक्रेते, दुकानदारांच्या 76 रॅपिड अँटीजन टेस्ट

शिरपूरात भाजीपाला विक्रेते, दुकानदारांच्या 76 रॅपिड अँटीजन टेस्ट

शिरपूर - Shirpur - प्रतिनिधी :

शिरपूर वरवाडे नगर परिषद पथकाने शहरातील वरझडी नाका परिसरात भाजीपाला विक्रेते आणि दुकानदारांच्या एकूण 76 जणांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या.

शिरपूर शहर व ग्रामीण भागात वाढते प्रमाण पाहता ब्रेक द चैनच्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरात वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भाजीपाला व फळे विक्रेते सुपर स्प्रेडर ठरु शकतात. तसेच करवंद नाका व वरझडी रोड या क्षेत्रातील गर्दी पाहता या परिसरातील सर्व भाजीपाला व फळे विक्रते तसेच काही नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. यात 76 रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येऊन चार जण पॉजिटिव्ह आढळले. त्यांना लगेचच उपजिल्हा रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले.

या दरम्यान तहसीलदार आबा महाजन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना कुलकर्णी, मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन करणार्‍या चार भाजी विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली तसेच पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

नगर परिषद आरोग्य अधिकारी डॉ. नितू बत्रा, प्रेमानंद महाजन, सागर कुलकर्णी, सुनील बारी, शुक्रवारी नगरपरिषद संचालित इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल च्या कर्मचारी यांनी रॅपिड टेस्ट करण्यासाठी सहकार्य केले.

तहसीलदार आबा महाजन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात येत आहे.

शिरपूर शहरातील व्यवसायिक दुकानदारांच्या रॅपिड टेस्ट करण्याची मोहीम दररोज राबविण्यात येणार असून नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल, सर्व नगरसेवक यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे तसेच व्यवसायिक दुकानदारांचे टप्प्याटप्प्याने रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com