वाढील बिलासंदर्भात मनपाकडे 30 तक्रारी प्राप्त

पथकाने केली 18 लाखपर्यंतची बिलात सवलत

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

करोना रुग्णांना वाढीव वैद्यकीय बिल दिल्याबाबत महापालिकेकडे 30 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अंतर्गत पथकाने 18 लाखपर्यंत बिलात सवलत मिळवून दिली आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. परंतू त्यांना रुग्णालय प्रशासन वाढीव बिल आकारत आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रारी आल्यामुळे आयुक्त अजीज शेख यांनी भरारी पथकांची नियुक्ती केली.

वाढीव बिल संदर्भात 30 तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे 30 मार्च ते 11 एप्रिल दरम्यान शहरातील विविध रुग्णालयात पथकाने भेट देवून बिलांची पडताळणी केली.

40 लाख 59 हजार 250 वैद्यकीय बिले देण्यात आली होती. परंतू पथकाने 18 लाख 17 हजार 950 रुपयांची सवलत बाधितांना मिळवून दिली.

भरारी पथकात देवपूर विभागासाठी सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर तर शहरी विभागासाठी सहाय्यक आयुक्त विनायक कोते हे नियंत्रण अधिकारी आहेत.

तर पथकात वरीष्ठ लेखापरिक्षक शिरसाठ, जाबळे, महापालिकेचे प्रदीप नाईक, बळवंत रनाळकर, राजेंद्र माईनकर, शिरीष जाधव, मधुकर निकुंभे, अभिजीत पंचभाई, सुनिल माकडे यांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com