जिल्ह्यात 298 पॉझिटीव्ह रुग्ण

चार जणांचा मृत्यू
जिल्ह्यात 298 पॉझिटीव्ह रुग्ण

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 298 करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्ण संख्या 31 हजार 462 वर पोहचली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 104, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 25, शिरपूर ब्लॉक रॅपीड टेस्टचे दोन, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

तसेच शिंदखेडा तालुका येथील रॅपीड अँटीजन टेस्टचे नऊ अहवाल, भाडणे ता. साक्री सीसीसीमध्ये 14, तसेच रॅपीड टेस्टचे 41, मनपा सीसीसीमधील 14, मनपा युपीएचसी तीन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तीन, एसीपीएम लॅबमधील 67 व खासगी लॅबमधील 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखला 69 वर्षीय पुरुष (धुळे), 70 वर्षीय महिला (स्वामी समर्थ कॉलनी शिंदखेडा) व उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे दाखल 40 वर्षीय पुरुष, 89 वर्षीय वृध्द (शिरपूर) या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 485 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com