जिल्ह्यात 452 पॉझिटिव्ह

दोन जणांचा मृत्यू
जिल्ह्यात 452 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात सोमवारी नव्याने तब्बल 452 करोना बाधित रूग्ण आढळून आले. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांची एकुण संख्या 31 हजार 164 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 425 अहवालांपैकी 64 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात एसआरपीएफतील दोन जणांचा समावेश आहे.

उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथील 33, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 15, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 31, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 5, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 170 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मनपा सीसीसी 118 पैकी 5, मनपा युपीएचसी 1414 पैकी 26, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2, एसीपीएमलॅबमधील 71, खाजगी लॅबमधील 29 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 50 वर्षीय महिला (डांगुर्णे ता. धुळे) व एसीसीपएम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 56 वर्षीय पुरूष (कोळदे ता. शिंदखेडा) या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 480 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com