धुळे कोविड हॉस्पीटल डॉट कॉमचा शुभारंभ

धुळे कोविड हॉस्पीटल डॉट कॉमचा शुभारंभ

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात उपलब्ध असणार्‍या बेडची माहिती देणारे पोर्टल धुळे कोविड हॉस्पीटल डॉट कॉमचा शुभारंभ आज जुन्या महापालिका इमारतीत करण्यात आला. या पोर्टलमुळे नागरिकांना घरबसल्या बेडची माहिती उपलब्ध होणार आहे.

यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, महापौर चंद्रकांत सोनार, महापालिका आयुक्त अजीज शेख, भाजपा महानगराध्यक्ष अनुप अग्र्रवाल, उपायुक्त शांताराम गोसावी, सभागृहनेते राजेश पवार, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त अजीज शेख म्हणाले की, शहरात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड मिळणे कठीण झाले आहे.

रुग्णांसह नातेवाईकांना बेडसाठी फिरावे लागते. त्यामुळे महापालिकेने जुन्या महापालिका इमारतीत कोविड सहाय्यता कक्ष कार्यान्वित केला आहे.

तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील बेडची माहिती आता धुळे कोविड हॉस्पीटल डॉट कॉम या पोर्टलवर मिळणार आहे.

महापालिकेचे कर्मचारी संबंधित हॉस्पीटलकडून दररोज अद्यावत माहिती घेवून ते या पोर्टलवर ऑपडेट करतील असे श्री. शेख यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com