धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाने चौघांचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी 24 तासात जिल्ह्यात 481 रुग्ण आढळले. बाधितांची संख्या 27 हजार 416 वर पोहचली आहे.

धुळे येथील एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात आंबोडे 45 वर्षीय पुरुष, भाडणे येथील 56 वर्षीय पुरुष, थाळनेर येथील 56 वर्षीय महिला तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 45 वर्षीय पुरुष कोरोना कक्षात उपचार घेत होते.

उपचार घेतांना चौघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 448 जणांचा बळी गेला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 196 तर ग्रामीण भागात 252 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालय येथील 25, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 11, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील 13, भाडणे साक्री सीसीसीमधील 64, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन, एसीपीएम लॅबमधील आठ, खासगी लॅबमधील 151 असे एकूण 481 रुग्ण आढळून आले आहेत.