धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी दिवसभरात नवीन तब्बल 457 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

तर धुळे शहरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण रूग्ण संख्या 25 हजार 480 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 94 अहवालांपैकी 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 33,उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 9, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 25, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 48, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 17 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 60, साक्री तालुका रॅपिड टेस्टचे 133, मनपा सीसीसीमधील 13, मनपा युपीएचसी रॅपिड अँटीजन टेस्टचे 8, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2, एसीपीएमलॅबमधील 7 व खाजगी लॅबमधील 88 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालया दाखल 45 वर्षीय पुरूष (कैलास नगर, धुळे), खाजगी हॉस्पिटलमधील 42 वर्षीय पुरूष (यशवंत नगर, धुळे) व 70 वर्षीय वृध्दाचा (धुळे) कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 423 जणांचा कोरोने बळी गेला आहे.