धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच असून शनिवारी दिवसभरात नवीन तब्बल 592 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

तर महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण रूग्ण संख्या 24 हजार 415 इतकी झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालया दाखल 68 वर्षीय महिला (बोधगाव, साक्री), 40 वर्षीय पुरूष (दोंडाईचा) व शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल 72 वर्षीय वृध्दाचा (पुंडलीक नगर, शिरपूर) कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 415 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

जिल्हा रुग्णालयातील 434 अहवालांपैकी 116 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या 573 पैकी 44, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ब्लॉक रॅपिड टेस्टच्या 123 पैकी 23, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 23 पैकी 7 तसेच शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या 300 अहवालांपैकी 88 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 96 पैकी 38, साक्री तालुका रॅपिड टेस्टच्या 1212 पैकी 161, मनपा सीसीसीमधील 1, मनपा युपीएचसी रॅपिड अँटीजन टेस्टच्या 1594 पैकी 5, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 43 पैकी 4, एसीपीएमलॅबमधील 22 पैकी 9 व खाजगी लॅबमधील 213 अहवालापैकी 96 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.