धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाचा विस्फोट झाला आहे. सलग दुसर्या दिवशी पावशे म्हणजेच 550 बाधित रूग्ण आढळू आले.

तर शहरातील तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.बाधितांची एकुण संख्या 22 हजार 430 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 105, प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपीड टेस्टचे 12, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 67, शिरपुर तालुका रॅपिड टेस्टचे 26, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 13, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 16, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 76, साक्री तालुका रॅपिड अँटीजन टेस्टचे 48, मनपा युपीएससी रॅपिड अँटीजन टेस्टचे 8, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 21, एसीपीएम लॅब 16 व खाजगी लॅब 142 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 70 वर्षीय पुरूष (राजवाडे नगर, चाळीसगाव रोड, धुळे), 66 वर्षीय पुरूष (कुमार नगर, धुळे) व 44 वर्षीय महिला (देवूपर) या करोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 405 जणांना कोरोनाने बळी घेतला आहे.

दरम्यान आश्रमशाळा सांगवी 1, पोलीस लाईन धुळे 1, बँक ऑफ बडोदा धुळे 1,पीबीएम विद्यालय 1, ग्रामीण रूग्णालय पिंपळनेर 1, शेवाळ ग्रा.पं 1, गारूडखे ग्रां.प 1, व्हीजेबीजेए शाळा पिंपळनेर 2, जुनी सेंट्रल बँक दहिवेल 1, पीएचसी कासारेत 1 रूग्ण आढळून आला आहे.