बोराडी - Boradi - वार्ताहर :

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रॅपिड अँटीजन टेस्टच्या अहवालात कोडीद येथील आश्रम शाळेतील सात विद्यर्थिनी करोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.

तर बोराडी येथे 6 असे एकूण 13 रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तर आजच्या अहवालात बोरीडीच्या पाच रुग्णांमध्ये रोहिणी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तसेच वाघाडीतील आर.सी.पटेल आश्रम शाळेतील विद्यार्थी व एक रुग्ण सांगवी येथील पॉझिटिव्ह आले आहे.

बोराडी व कोडीद गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी गाव- पातळीवर व प्रशासनाने योग्य काळजी घेतल्यास कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

यासाठी व्यापारी वर्ग पूर्णपणे सहकार्य करीत आहे. तर काहीजण शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून विना मास्क फिरताना दिसून येत आहे. त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बोराडी गावात गेल्या आठ-दहा दिवसात 13-14 रुग्ण आढळून आले आहे. तर कोडीद येथील आश्रम शाळेतील सात विद्यार्थीनी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

त्यांना शिंगाव येथील कोवीड सेंटरला दाखल करण्यात आले आहे. मुख्याध्यापक बोरसे यांनी शाळेत फवारणी करुन योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

दुसर्या विद्यार्थ्यांची देखील तपासणी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे.