धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात गुरुवारी 24 तासात 494 करोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात बाधितांची संख्या 20 हजार 622 वर पोहचली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 139, धुळे तालुका रॅपीड अँटीजन टेस्ट 4, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय 9, शिरपूर ब्लॉक रॅपिड टेस्ट 20, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय 15, शिंदखेडा तालुका रॅपीड अँटीजन टेस्ट 19, भाडणे साक्री सीसीसी मधील 16, रॅपीड अँटीजन टेस्ट 47,

महापालिका सीसीसी मधील 5, महापालिका रॅपीड अँटीजन टेस्ट 12, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 8, एसीपीएम लॅबमधील 12, खासगी लॅबमधील 188 असे एकूण 494 रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळून आले आहेत.