धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात नवीन 264 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यात बाधितांची संख्या 18 हजार 591 वर पोहचली आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाची संख्या चांगलीच वाढली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 24, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय 19, उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा 17, प्राथमिक आरोग्य केंद्र चिमठाणेतील रॅपीड अँटीजन टेस्टचे 3, भाडणे ता. सीसीसीमधील 25, रॅपीड अँटीजन टेस्टचे 15, प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुक्यातील रॅपीड टेस्टचे 6, महापालिका रॅपीड टेस्टचे 12, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 22, एसीपीएम लॅबमधील 16, खासगी लॅबमधील 105 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

साक्री पंचायत समितीत दोन रूग्ण

जिल्ह्यात आढळून आलेल्या रूग्णामध्ये शारदा नेत्रालय 2, शेवाळी ग्रा.पं 7, नवापाडा ग्रा.पं 1, पंचायत समिती साक्री 2, ग्रामीण रूग्णालय साक्री 4, बेहेड ग्रा.पं 1, चिकसे ग्रा.पं 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 4, एसीपीएम कॉलेजमधील 2 रूग्णांचा समावेश आहे.