धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना महामारीचा उद्रेक झाला असून गुरुवारी 24 तासात 207 बाधीत आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालय येथील 30, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय सहा तसेच रॅपीड अँटीजन टेस्टचे नऊ, भाडणे साक्री सीसीसी रॅपीट अँटीजन टेस्टचे तीन, प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन, महापालिका रॅपीड अँटीजन टेस्टचे 48, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चार, एसीपीएम लॅबमधील पाच, खासगी लॅबमधील 86 असे 24 तासात 207 बाधीत आढळले आहेत.

जिल्ह्यात बाधितांची संख्या 16 हजार 367 वर पोहचली आहे.