धुळे - Dhule - प्रतिनिधी :

साक्री तालुक्यातील दुसाणे आणि बसरावळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन कोरोना रुग्ण आढळून आला आहे. गुरुवारी 24 तासात जिल्ह्यात 19 रुग्ण आढळले.

जिल्हा रुग्णालय येथील तीन, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील तीन, भाडणे साक्री सीसीसीमधील तीन, रॅपीड अँटीजन टेस्टमधील एक, महापालिका रॅपीड अँटीजन टेस्टमधील एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमधील एक, खासगी लॅबमधील सात असे 19 बाधीत आढळून आले आहेत. त्यात बसरावळ प्राथिमक आरोग्य केंद्रात एक आणि दुसाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात बाधितांची संख्या 14 हजार 743 वर पोहचली आहे.