धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना रूग्ण संख्येच चांगलीच घट झाली आहे. बुधवारी दिवसभरात केवळ सात नवीन रूग्ण आढळून आले.

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 62 वर्षीय महिलेचा (कुसुंबा ता.धुळे) कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 390 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. एकुण रूग्ण संख्या 14 हजार 624 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 69 अहवालांपैकी 4, शिरपूर उपजिल्हा रूग्णालयातील 24 पैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व 10 अहवाल, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 49 अहवाल, महापालिका रॅपिड अँटीजन टेस्टमधील सर्व 152 अहवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 10 अहवाल अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर

एसीपीएम लॅबमधील 6 पैकी 1 अहवाल, खाजगी लॅबमधील 12 अहवालापैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.