जिल्ह्यात नवीन 12 पॉझिटिव्ह

जिल्ह्यात नवीन 12 पॉझिटिव्ह

धुळे - Dhule - प्रतिनिधी

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात नवीन 12 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. एकुण रूग्ण संख्या 14 हजार 566 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील 47 अहवालांपैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व 20 अहवाल व रॅपिड अँटीजन टेस्ट मधील 26 अहवाल निगेटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 17 अहवालांपैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

भाडणे ता. साक्री सीसीसीमधील सर्व 36 अहवाल अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच रॅपिड अँटीजन टेस्टच्या 5 अहवालांपैकी 1 अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.

महापालिकामधील सर्व 27 अहवाल व रॅपिड अँटीजन टेस्टमधील 150 अहवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 4 अहवाल निगेटिव्ह आले आहे.

खाजगी लॅबमधील 17 अहवालापैकी 7 अहवाल व एसीपीएम लॅबमधील 6 अहवालापैकी 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com