धुळे - Dhule- प्रतिनिधी :

धुळे तालुक्यातील कापडणे प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना रुग्ण आढळून आला आहे. तर बुधवारी 24 तासात 24 रुग्ण आढळून आले.

काल मंगळवारी रुग्ण संख्या घटली होती. केवळ जिल्ह्यात तीन बाधीत आढळले होते. परंतु बुधवारी पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली असून 24 रुग्ण आढळले आहेत.

जिल्ह्यात बाधितांची संख्या 14 हजार 539 वर पोहचली आहे. रुग्ण संख्येत चढ-उतार होत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनानेक केले आहे.