जिल्ह्यात करोनाबाधित पाच जणांचा मृत्यू

जिल्ह्यात करोनाबाधित पाच जणांचा मृत्यू

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोनाने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

तर नव्याने 152 रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत बाधितांची संख्या सात हजार 822 झाली आहे. तर जिल्ह्यात 233 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणारे धुळे येथील मधुकर भाऊसाहेब नगरातील 66 वर्षीय पुरुष, निजामपूर येथील 61 वर्षीय महिला आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणारे कलमाडी येथील 58 वर्षीय महिला, दोंडाईचा येथील 58 वर्षीय पुरुष, धुळे येथील दत्तमंदीर येथील 69 वर्षीय पुरुष यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 233 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 111 आणि ग्रामीण भागात 122 रुग्णांचा समावेश आहे.

धुळे जिल्हा रुग्णालय येेथे 12 अहवाल, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 41 अहवाल, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 12 अहवाल, भाडणे साक्री सीसीसी येथील दोन अहवाल, महापालिका पॉलिटेक्निक येथील 16 अहवाल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तर खासगी लॅबमधील 60 अहवाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सात हजार 822 रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com